Please wait...
८ मार्च 2023 रोजी जिल्हा कृती आराखडा चे अनावरण मा. प्रीतम गोपीनाथ मुंडे, खासदार , बीड लोकसभा मतदारसंघ यांनी केले. यावेळी मा. दीपा मुधोळ - मुंडे, जिल्हाधिकारी, बीड, मा. नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक,बीड मा. अजित पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,बीड व सर्व विभाग प्रमुख उपस्थितीत होते.
जिल्हा कृती आराखड्यामध्ये ठरल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी बालविवाह प्रतिबंधक शपथ घेतली जात आहे.
-
14 ऑगस्ट 2023 रोजी 3800 शालेय विद्यार्थ्यांनी बालविवाह निर्मुलन जनजागृती रॅली काढली. यावेळी ECM- Ending Child Marriage अशी रचना विद्यार्थ्यांनी केली.
15 ऑगस्ट 2023 रोजी मा. श्री.धनंजय मुंडे, कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री, बीड यांच्या उपस्थितीत मा.दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी बीड, श्री.नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक,बीड व मा. अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,बीड यांच्या हस्ते करण्यात आले.
बालविवाह विरुद्ध लढा या लघुपटाचे उद्घाटन मा. एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. श्री.धनंजय मुंडे, कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री, बीड यांच्या उपस्थितीत मा.दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी बीड, श्री.नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक,बीड व मा. अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,बीड यांच्या उपस्थितीत 5 डिसेंबर 2023 रोजी बीड जिल्ह्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात करण्यात आले. बालविवाह विरुद्ध लढा लघुपटाची लिंक- https://youtu.be/PGqWh-32OoE?feature=shared
मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम करण्याकरता थ्रो-बॉल या खेळाची सुरुवात जिल्ह्यातील इ. 6 वी ते 10 वीचे वर्ग असलेल्या शाळांमध्ये करण्यात आली.
मा.आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र शासन यांनी घेतली. बीड जिल्हा प्रशासनाच्या बालविवाह निर्मुलन कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेण्याकरिता मा.आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र शासन यांनी मंत्रालय, मुंबई येथे विशेष बैठक घेतली. या बैठकीसाठी मा.दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी, बीड यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा बालविवाह निर्मुलन कार्यक्रम अंमलबजावणी करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची टीम उपस्थित होती.
`
_